सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तब्बल दहा लाखांची फसवणूक करणारा आणि पाच महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणारा जोतीराम बालमुकुंद काटकर हा भामटा अखेर म्हसवड पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे यांनी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता पत्रकारांना माहिती दिली. फिर्यादी जयवंत राजाराम घाडगे (रा. माळशिरस) यांच्या मुलीला सरकारी नोकरी लावतो अशी बतावणी करून आरोपीने दहा लाख रुपये घेतले होते.