दक्षिण सोलापूर: शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व हेक्टरी ५० हजाराची तात्काळ मदत द्या : सामाजिक कार्यकर्ते महमद शेख यांची मागणी...
अतिवृष्टीमुळे दक्षिण तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शासनाने तात्काळ दिलासा देण्यासाठी सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महमद शेख यांनी सोमवारी दुपारी 3 वाजता पत्रकारांशी बोलताना केली आहे. त्यांनी सांगितले की, सध्या शेतकऱ्यांवर कर्जाचा प्रचंड बोजा आहे. पिकांचे नुकसान, जनावरांच्या चाऱ्याची टंचाई आणि जीवनावश्यक खर्च यामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. म्हणूनच शासनाने प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत द्या.