रावणवाडी येथे झालेल्या अपघातात जितेंद्र सोनवाने वय 39 वर्ष राहणार सावरी तालुका लांजी, हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला दिनांक 22 नोव्हेंबर रोजी शनिवारला रात्री 9 वाजेच्या सुमारास उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून या घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिसांनी घेतली आहे. तपास सुरू आहे.