घनसावंगी: खडका गावातील अवैध दारू विक्री प्रकरणी महिलांची थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धडक
घनसावंगी तालुक्यातील खडका गावात सुरू असलेल्या अवैध देशी व विदेशी दारू विक्रीस विरोध करत गावातील महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. त्यांनी "हॉटेल निवांत बिअरबार व परमिट रूम" या ठिकाणी बनावट दस्तावेजांद्वारे मिळवलेला परवाना तत्काळ रद्द करण्याची जोरदार मागणी केली. महिलांनी याआधीही तिर्थपुरी पोलीस ठाण्यात १० एप्रिल रोजी तक्रार दिली होती, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही असा आरोप महिलांनी करत थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धडक मारली व त्यांचा संताप अधिक तीव्र झाला.