नागरा गावात अवैधरित्या मोहाफुलाची दारू बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवण्यात आल्याप्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून दारू जप्त केली. ही कारवाई २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजताच्या दरम्यान करण्यात आली. या प्रकरणी चिमन रामकिशन नेवारे (५५) रा. नागरा, ता. जि. गोंदिया याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या घरासमोरील अंगणात एका कोपऱ्यात मातीच्या मटक्यात ९ लिटर मोहाफुलाची दारू अवैधरित्या साठवून ठेवलेली आढळून आली.