३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील चार तालुक्यात वृक्ष लागवड व करारानुसार तीन वर्ष वृक्षांची देखभाल केल्यावर सदर योजना वनविभागाला हस्तांतरीतही करण्यात आली. परंतु सदर काम करणार्या कंपनीच्या कंत्राटदाराचे २ कोटी रूपयांचे देयक शासनाकडे २ वर्षापासून थकले आहे. यातच त्यांचे गहाण ठेवलेले घर बँकेने लिलावात काढले आहे. त्यामुळे बारेवार यांनी १० नोव्हेंबर रोजी आत्मदहन करण्याची परवानगी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागितली आहे.