पनवेल: नेरूळ सेक्टर २० येथे महिलेचा मोबाईल केला लंपास, नेरूळ पोलिसांत गुन्हा दाखल
Panvel, Raigad | Apr 4, 2024 नेरूळ सेक्टर २० येथे रेश्मा पाटील या महिलेचा मोबाईल चोरांनी लंपास केला. त्या रेल्वे स्थानकालगत असलेल्या ठिकाणी भाजी घेण्यासाठी थांबल्या होत्या. त्याचदरम्यान त्यांचा मोबाईल गेल्याचे त्यांनी तक्रारीत म्हंटले आहे. त्या सेक्टर १० येथे जात असताना त्यांना ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने नेरूळ पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासास सुरुवात केली आहे.