नागभिर: आकिपूर येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, तीन तास तणावग्रस्त वातावरण
नागभिड तालुक्यातील तळोधी (बालापूर) जवळील आकापूर शेतशिवारात आठवडाभरापासून दिसणाऱ्या वाघाने आज शनिवार, २५ ऑक्टोबर सकाळी एका शेतकऱ्याचा बळी घेतला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतकाचे नाव वासुदेव लक्ष्मण वेठे (५५), रा. आकापूर असे आहे.गेल्या आठ दिवसांपासून आकापूर परिसरात वाघ फिरत असल्याची माहिती नागरिकांनी तलोधी वनपरिक्षेत्र कार्यालयाला दिली होती. मात्र वनविभागाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने आज ही दुर्दैवी घटना घडली. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी घटना