नांदुरा: तहसीलदारांनी दिलेल्या तोंडी
आश्वासनाने क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बेमुदत बिस्तर बिछाव मुक्काम आंदोलन सुटले
शेतकऱ्यांच्या विविध मागण्या साठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने नांदुरा तहसीलसमोर तालुका अध्यक्ष विठ्ठल वानखेडे यांच्या नेतृत्वात ३ नोव्हेंबर पासून बेमुदत बिस्तर बिछाव मुक्काम आंदोलन सुरू करण्यात आले होते.तहसीलदार अजितराव जंगम यांनी दिलेल्या तोंडी आश्वासनाने हे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे.लवकरात लवकर सर्व मागण्या सोडवण्यात येईल असे आश्वासन तहसीलदार जंगम यांनी दिले आहे.