चामोर्शी: गडचिरोलीत आंबा लागवडीसाठी प्रशासकीय सहकार्य, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा
गडचिरोली, २६ सप्टेंबर: महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत गडचिरोली येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यशाळेत, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आंबा लागवडीतून शेतकऱ्यांचे निव्वळ उत्पन्न वाढवण्यासाठी प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. गट शेती आणि आधुनिक लागवड पद्धतींवर भर देण्याचे आवाहनही त्यांनी केले.कार्यशाळेत, फळबाग तज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी गडचिरोलीचे हवामान आंबा लागवडीसाठी योग्य असूनही स्थानिक वाणांमुळे योग्य भाव मिळत नसल्याचे सांगितले. त्यांन