ख्रिसमस निमित्त दयासागर हॉस्पिटल येथे आकर्षक देखावा; शहरवासीयांची मोठी गर्दी ख्रिसमस सणाच्या निमित्ताने शहरातील दयासागर हॉस्पिटल परिसरात येशू ख्रिस्तांच्या जन्मावर आधारित अत्यंत आकर्षक असा देखावा उभारण्यात आला आहे. या देखाव्यात गोठा, बाल येशू, माता मरियम, जोसेफ तसेच देवदूतांच्या सजीव प्रतिकृती साकारण्यात आल्या असून संपूर्ण परिसर रंगीबेरंगी रोषणाईने उजळून निघाला आहे. ख्रिसमसच्या आनंदी वातावरणात हा देखावा नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.