रामटेक: गांधी चौक, रामटेक येथे भारत-दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट अंतिम सामन्यात रंगले रामटेकवासी
Ramtek, Nagpur | Nov 2, 2025 रविवार दिनांक 2 नोव्हेंबरला सायंकाळी चार वाजता पासून गांधी चौक रामटेक येथे भाजपाच्या नागपूर जिल्हा महिला आघाडीच्या महामंत्री ज्योतीताई कोल्हेपरा, समाजसेवी गोपी कोल्हेपरा यांचे सौजन्याने भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात मुंबई येथे सुरू असलेल्या महिला क्रिकेट वर्ल्ड कपचा अंतिम सामना मोठ्या स्क्रीनवर दाखविण्यात येत आहे. याचा रामटेकातील महिलावर्ग, नागरिक, युवक आनंद घेत आहेत. दुपारी तीन वाजता पासूनच रामटेक येथील क्रिकेट प्रेमी तथा महिला गांधी चौक रामटेक येथे जमा होऊ लागले होते.