यवतमाळ: शहरातील महावीर नगर भाग 2 येथे घरफोडी ; 3 लाख 64 हजाराच्या मुद्देमाल लंपास
यवतमाळ शहरातील महावीर नगर भाग 2 येथे राहणाऱ्या सौ राजकन्या आढउकर यांच्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम तसेच मोबाईल असा ऐकून तसेच रोख रक्कम असा एकूण 3 लाख 64 हजाराच्या मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. सदर घटने प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोहारा पोलिसांमार्फत सुरू आहे.