गेवराई: बंगालीपिंपळा गावात लंपी आजाराने थैमान
Georai, Beed | Oct 23, 2025 गेवराई तालुक्यातील बंगालीपिंपळा गावात लंपी आजाराने थैमान घातले आहे. या आजारामुळे 9 बैलांचा मृत्यू झाला असून अनेक जनावरे गंभीर अवस्थेत आहेत. गावातील शाम बन, बाळू बन, जाकेर जाहगिरदार, आणि कैलास पांढरमिसे या शेतकऱ्यांचे जनावरे दगावल्याची माहिती गुरुवार दि.23 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता प्रसार माध्यमातून देण्यात आली.शेतकरी आधीच अतिवृष्टीमुळे अडचणीत असताना लंपी आजाराने त्यांची चिंता वाढवली आहे. तरीही पशुसंवर्धन विभागाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आह