रामटेक: नगर परिषद रामटेक प्रभाग 6 अ,महिला ओबीसी प्रवर्गाची निवडणूक स्थगित
Ramtek, Nagpur | Nov 30, 2025 जिल्हाधिकारी नागपूर यांचेकडून निवडणूक निर्णय अधिकारी नगरपरिषद रामटेक यांना प्राप्त झालेल्या एका आदेश पत्रा नुसार रामटेक नगरपरिषद चे अंतर्गत प्रभाग 6 अ ओबीसी महिला प्रवर्गातील निवडणूक ही तूर्तास स्थगित करण्यात आली असून नवीन सुधारित कार्यक्रमानुसार या जागेची निवडणूक आगामी 20 डिसेंबर ला होऊ घातली आहे. काँग्रेसचा उमेदवार अनिता टेटवार यांनी त्यांचा नामांकन पत्र छाननी दरम्यान अवैध ठरविल्याने त्यांनी जिल्हा न्यायालय नागपूर येथे अपील केली होती.