महाराष्ट्रातील महसूल कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेल्याने सातारा जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसील कार्यालयांमध्ये कर्मचारी अनुपस्थित असल्याने कार्यालये अक्षरशः रिकामी दिसत असून नागरिकांची दैनंदिन कामे खोळंबली आहेत.राज्यभर सुरू असलेल्या महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका सातारा जिल्ह्याला बसला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तालुकास्तरावरील तहसील कार्यालयांतील कामकाज ठप्प झाले