जुना पोलीस लाईन मुरारजी पेठ येथे राहण्यास असलेल्या डॉक्टर सुप्रिया स्वानंद रेडेकर (वय-३१,रा.जुना पोलीस लाईन,मुरारजी पेठ) या ड्युटीवर गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून बेडरूम मधील टीव्ही ड्रॉवरमध्ये ठेवलेले ९० हजार रुपये किमतीचे १.५ तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे.ही घटना ३० ते ३१ ऑगस्ट दरम्यान घडली.याप्रकरणी डॉक्टर सुप्रिया रेडेकर यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.