भाजपाकडे सत्ता, प्रशासन व पैसा; तरीही वास्तव वेगळेच – यशोमती ठाकूर यांचा आरोप अमरावती : “मी असे म्हणणार नाही की भाजपचे पानिपत झाले, पण आमचेही झालेले नाही. हीच खरी वास्तविकता आहे,” असे स्पष्ट मत काँग्रेस नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, भाजपकडे शासन, प्रशासन, पैसा आणि सत्तेची ताकद असूनही त्यांनी दमदाटी व अरेरावी करून निवडणुका लावून घेतल्याचे सर्वांनी पाहिले आहे.