गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे कवडसी ते नांदोरा दरम्यानचा रस्ता पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थांची होणारी मोठी कोंडी जिल्हा परिषद सदस्य प्रेमभाऊ वनवे यांच्या तत्परतेमुळे सूटली आहे. या समस्येबाबत वनवे यांनी लेखी निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले होते, मात्र त्यानंतरही तोडगा निघत नसल्याने स्थानिकांनी पुन्हा त्यांच्याकडे धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रेमभाऊ वनवे यांनी तातडीने गोसेखुर्द प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना फोन करून प्रत्यक्ष घटनास्थळी पाचारण केले.