कर्जत: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला यश आल्याने कर्जत शहरात सकल मराठा समाज बांधवांनी केला जल्लोष
Karjat, Raigad | Sep 3, 2025 मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीकरता मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू केले होते त्याचे पाचव्या दिवशी शासनाच्या उपसमितीने उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्या मागण्या मान्य केल्याने कर्जत शहरात आज सकाळी सकल मराठा समाज बांधवांनी एकच जल्लोष केला.