धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला लोकशाही दिनात अन्सार नगर येथील नसरीन शेख गनी यांनी सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांविरोधात गैरवर्तनाची तक्रार दाखल केली. प्रसूतीसाठी दाखल असताना औषधे मागवून सहीसाठी दबाव टाकल्याचा आणि हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याचा दावा त्यांनी केला. चौकशी समितीने डॉक्टरांना निर्दोष ठरवल्याने अन्याय झाल्याचा आरोप करत त्यांनी न्यायाची मागणी केली आहे.