कोपरगाव: येसगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, आ.काळे यांनी लावला थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन
येसगाव शिवरात बिबट्याच्या हल्ल्यात आज १० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता ल एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असुन आ.आशुतोष काळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी फोनवर संपर्क करुन घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले. अजितदादा पवार यांनी सदर बिबट्याला ठार करण्यासाठी व इतर उपाययोजना करण्यासाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्याचे आश्वासन दिले.