कोपरगाव: येसगाव शिवारात निकाळे वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार, नागरिक आक्रमक
कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारातील निकाळे वस्ती येथे आज १९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शांताबाई आहिल्या निकाळे( वय 65) या त्यांच्या घरासमोरील घासांमध्ये घास कापण्यासाठी गेल्या असता कपाशीमध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने शांताबाई निकाळे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याने त्या जागेवरच ठार झाल्या आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे , संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी घटनास्थळी धाव घेतली.