निलंगा: निलंगा मतदारसंघातील नुकसानीच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय, निलंगा येथे आढावा बैठक संपन्न!
Nilanga, Latur | Sep 30, 2025 निलंगा मतदारसंघातील नुकसानीच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय, निलंगा येथे आढावा बैठक संपन्न! निलंगा मतदारसंघात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीचा व मतदारसंघात सुरु विविध विकासकामांचा आढावा घेण्याबाबत आज तहसिल कार्यालय, निलंगा येथे आढावा बैठक पार पडली. दरम्यान नुकसानीचे पंचनामे, मदत तसेच इतर मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. तसेच मतदारसंघात सुरु विविध कामांचा आढावा घेतला व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.