मलकापूर: अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची हेक्टर 50 हजार रुपये मदत देण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
नांदुरा-मलकापूर तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. सोयाबीन पिक हे वेगवेगळ्या रोगाने घेरले असून हुमनीअळी व येलोमोझ्याक असे गंभीर रोग सोयाबीन या पिकावर आल्याने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले.नांदुरा-मलकापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करा असे निवेदन २२ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले.