आज दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी पंचायत समिती, कळमेश्वर येथे पाणी टंचाई निवारणाबाबत आढावा बैठक माझ्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.या बैठकीदरम्यान पाणी टंचाईची सद्यस्थिती, संभाव्य उपाययोजना तसेच तातडीच्या कृती आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करून तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.