भोकरदन: पुढचे दोन अडीच महिने निवडणूक काळ, आमदार संतोष पाटील दानवे यांनी भाजपा कार्यालयावर दिली माहिती.
आज दिनांक 6 नोव्हेंबर 2025 वार गुरुवार रोजी दुपारी 4 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी माहिती दिली आहे ,की पुढचे दोन अडीच महिने हे निवडणूक काळ आहे आणि या निवडणुकीदरम्यान सर्व शेतकरी ,कष्टकरी ,मोलमजूर हे सरकारने त्यांच्यासाठी राबवलेल्या योजना यासंदर्भात समाधानी असून त्याची उत्तर ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये सरकारच्या दिशेने देणार व पुन्हा जिल्ह्यात भाजप एक नंबर पक्ष होणार असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.