सावनेर तालुक्यातील उमरी (बी) – सालई – नांदागोमुख – मालेगाव पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.या प्रसंगी सावनेर या दोन्ही तालुक्यांतील विकासकामांना गती मिळणार असून, नागरिकांना दळणवळणाच्या सोयीसुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे. या पुलांच्या उभारणीमुळे ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यास मदत होणार असून, स्थानिक नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ होईल.