नवेगाव बांध येथे आरुषी ग्रुप ऑफ एज्युकेशनचा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.शिक्षणासोबतच सांस्कृतिक, क्रिडा स्पर्धांमध्ये सहभाग घेणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो, नेतृत्वगुण विकसित होतात, संघभावना निर्माण होते तसेच संवादकौशल्य आणि सर्जनशीलतेला सुद्धा चालना मिळते