आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत जि. प. हायस्कूल दवनीवाडा समोर ₹१० लक्ष रुपये निधीतून होणाऱ्या सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते संपन्न झाले. या सभामंडपामुळे विद्यार्थ्यांना, ग्रामस्थांना व विविध सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.