कन्नड: कॉम्प्युटर कोर्ससाठी घरातून बाहेर गेलेली सातकुंड येथील मुलगी बेपत्ता
कन्नड तालुक्यातील सातकुंड येथील साडेसोळा वर्षीय अंजली रतन राठोड ही गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी अंजलीची आई विमलबाई रतन राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अंजली ही दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कन्नड येथे कॉम्प्युटर कोर्ससाठी जाते म्हणून घरातून बाहेर पडली परंतू परत आलीच नाही. नातेवाईक व गावात चौकशी केली असता ती कोठेच मिळाली नाही. कोणीतरी तिला फूस लावून पळवून नेले असल्याच संशय आहे.