गोंडपिंपरी: अतिवृष्टी व पूरग्रस्त यादीत गोंडपीपरीला वगळल्याने शेतकरी संतप्त आ. भोंगळे यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट
सन २०२५ मधील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागासाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करण्यात आले. या पॅकेजमधून गोंडपिपरी तालुक्याला वगळण्यात आल्यामुळे स्थानिक शेतकरी बांधवांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर येथे आमदार देवराव भोंगळे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तालुक्याला पुन्हा समावेश करण्याची मागणी करण्यात आली.