मुखेड: मुखेड-कंधार विधानसभा मतदारसंघात 17 कक्षांची स्थापना; तहसील कार्यालयात सहाय्यक निवडणूक अधिकारी कुलदीप जंगम यांची माहीती.
Mukhed, Nanded | Apr 25, 2024 91 - मुखेड कंधार मतदार संघामध्ये प्रशासनाच्या वतीने मुखेड मतदार संघातील एकुण 362 मतदान केंद्रासाठी 2 लाख 96 हजात 516 एवढे मतदार मतदान करणार असुन त्यापैकी शहरी 24 हजार 330 एवढे मतदार आहेत , त्यामध्ये पुरुष 12 हजार 238 व महिला 12 हजार 091 तसेच इतर 1 असे मतदार आहेत . उर्वरित 2 लाख 72 हजार 186 ग्रामीण मतदार असून त्यामध्ये 1 लाख 42 हजार 945 व स्त्री 1लाख 29 हजार 234 व तसेच इतर 7 एवढे मतदार आहेत . त्याकरिता एकुण 1667 मतदान अधिकारी व 800 पोलिस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यांत आलेली आहे .