आर्वी: खार्डीपुरा येथे दारू विक्रेत्यावर पोलिसांनी केली कार्यवाही
Arvi, Wardha | Sep 17, 2025 खार्डीपुरा येथे दारू विक्रेत्यावर पोलिसांनी कारवाई करून त्याच्याकडून गावठी मोहा दारू जप्त केली दिनांक 16 तारखेला साडेसात ते रात्री आठच्या दरम्यान ही कार्यवाही करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.. दारू विक्रेता पुंडलिक बापूजी बेलखडे वय 70 वर्ष राहणार वार्ड क्रमांक एक खर्डीपुरा कारंजा याच्यावर पोलीस स्टेशन कारंजा अपराध क्रमांक 666 /25 कलम 65 महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगितले