सांगोला: "पैसे नको,अन्न व ऊब द्या!"- पूरग्रस्तांसाठी किसान आर्मीचे अध्यक्ष प्रफुल्ल कदम यांची वासुद रोड येथे मदतीची हाक
सांगोला तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी किसान आर्मीचे अध्यक्ष प्रफुल्ल कदम यांनी ज्वारीचे पीठ आणि ब्लँकेट स्वरूपात मदतीचे आवाहन केले आहे. त्यांनी रोख रक्कम न स्वीकारता प्रत्येक गावातून किमान एक ते दोन क्विंटल ज्वारी दळून देण्याचे आवाहन केले आहे. माणगाव, वासुद, वाटेमबर आदी गावांतील नागरिकांनी तातडीची मदत जाहीर केली आहे. मदत वासुद रोडवरील प्रफुल्ल कदम यांच्या कार्यालयात जमा करण्याची विनंती २८ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास केली आहे.