आमगाव: आमगावमध्ये वादातून मारहाण, व्यक्ती जखमी, बनगाव येथील घटना
Amgaon, Gondia | Sep 16, 2025 आमगाव तालुक्यातील बनगाव येथे १५ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाणीची घटना घडली. फिर्यादी विजय धनलाल बोहरे (वय ४३) हे जेवणानंतर गावातील दुकानात खर्रा घेण्यासाठी गेले असता आरोपी लालु गोपाल फुंडे (वय अंदाजे ३८) याने पैशाच्या वादातून त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली.आरोपीने सुरुवातीला बोहरे यांना थप्पड व बुक्क्यांनी मारले, त्यानंतर हातातील स्टीलच्या खड्यनीने उजव्या डोळ्यावर वार