जालना महानगरपालिकेच्या निवडणूका जाहिर झाल्याने आचारसंहिता लागू झाल्या आहेत. त्यामुळे जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांत लावण्यात आलेल्या बॅनेर, पोस्टर आणि झेंडे काढून घेण्यात आलेत. मंगळवार दि. 16 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेच्या कर्मचार्यांनी सार्वजनिक ठिकाणी लावलेले झेंडे, बॅनर, पोस्टर तसेच इतर प्रचार साहित्य काढून ते जमा केले. आचारसंहिता लागू होताच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शहरातील प्रमुख रस्त्यावरील होर्डिंग काढले.