नांदुरा: ग्राम रोजगार सेवकांच्या कामबंद आंदोलनाला जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचा पाठिंबा– राज्य कार्याध्यक्ष प्रशांत जामोद
रोजगार सेवकांच्या काम बंद आंदोलनाला आता जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने सुद्धा पाठिंबा दिला आहे. दिनांक 18 सप्टेंबर पासून रोजगार सेवकांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे,कारण रोजगार सेवकांना दरमहा एकत्रित दहा हजार रुपये मानधन देण्याचा शासन निर्णय दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी घेण्यात आला, परंतु त्यांची अंमलबजावणी होत नसल्याने 18 सप्टेंबर पासून नांदुरा तालुक्यातील सर्व रोजगार सेवक हे बेमुदत काम बंद आंदोलनावर गेले आहेत.आता या आंदोलनाला जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने सुद्धा पाठिंबा दिला दिलाय.