नागपूर ग्रामीण: पारडी हद्दीतील इंडियन ऑइल पेट्रोल पंपा समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
पोलीस ठाणे पारडी हद्दीतील इंडियन ऑइल पेट्रोल पंपा समोर साठ वर्षीय अज्ञात व्यक्ती रोडने पायदळ जात असताना अज्ञात वाहन चालकाने त्यांना जोरदार धडक दिली . पोलिसांनी त्यांना उपचाराकरिता मेयो रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला याप्रकरणी पारडी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.