हिंगणघाट: शेतकरी कर्जमाफीसाठी नंदोरीत माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांची ऐल्गार सभा:शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर केले मार्गदर्शन
नंदोरी येथे शेतकरी नेते माजी मंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या भव्य शेतकरी एल्गार सभा पार पडली यावेळी बच्चू कडू म्हणाले की येत्या २८ ऑक्टोबर बुटीबोरी ते जामठा पायदळ वारी असून २८ ऑक्टोबर पासून ३ दिवसीय मुक्कामी आंदोलन होणार आहे यानंतर जर सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढले नाही तर नागपूर येथे भव्य अस अभिनव आंदोलन उभे करण्यात येईल जर कापूस केंद्र सोयाबीन केंद्र जिल्यात सुरू झाले नाही तर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात घुसून स्वताला कार्यालयात बंद करून घेऊ असा इशारा दिला.