समुद्रपूर: रात्रीला सिंगल फेज विद्युत पुरवठा देण्यासाठी शेतकऱ्याचा शहरातील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर ठिय्या
समुद्रपूर: तालुक्यातील वायगाव (हळद्या) मुरादपुर, लसनपुर, आणि बोळखा शेत शिवारात रात्रीला सिंगल फेज विद्युत पुरवठा देण्याच्या मागणीसाठी शेतकरी समुद्रपूर शहरातील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत यासंबंधी उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे.या निवेदनातून मागणी करण्यात आली आहे की रात्रीच्या वेळी शेतामध्ये सिंगल फेज विद्युत पुरवठा सुरू असल्याने शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यास शेतात रात्रीच्या वेळी जनावरे ठेवण्यास सोयीस्कर होते.मात्र १ वर्षापासून बंद करण्यात आला आहे.