सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात शेतात काम करणाऱ्या महिलेवर वाघाने हल्ला केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. छाया उर्फ अरुणा अरुण राऊत (४७, रा. गुंजेवाही) असे मृतक महिलेचे नाव आहे. या घटनेने यावर्षीचा जिल्ह्यातील वाघाच्या हल्ल्यातील मृतांचा आकडा ४१ वर पोहोचला आहे. मृत महिला नेहमीप्रमाणे दुपारी शेतात गेली होती. सायंकाळ होऊनही घरी न परतल्याने कुटुंबीयांच्या मनात