हिंगणघाट: अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या विरोधात पोलिसांची कारवाई:१६ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
जाम परीसरात नाकाबंदी करून नागपूरकडून हैदराबादकडे वाहनात डांबून अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या विरोधात पोलिसांनी कारवाई करीत ८ जनावरांची सुटका करीत १६ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.यासंबंधी २ आरोपींना अटक केली. रात्रीच्या सुमारास जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांना मिळताच त्यांनी यासंबंधी पोलीस ठाण्याला सुचना केल्या.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायर यांच्या मार्गदर्शनात हि कारवाई केली.