जालना महानगरपालिका निवडणुकीच्या आरक्षण सोडतीची प्रतीक्षा आज संपली असून, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार दि. 11 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता आरक्षण सोडत पार पडली. निवडणुकीसाठी विविध प्रभागांसाठी ही सोडत घेण्यात आली असून, यात महिलांसह अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि भटक्या प्रवर्गातील उमेदवारांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली हे आरक्षण सोडत काढण्यात आले.