केळवद येथील जीर्ण आणि अत्यंत धोकादायक झालेल्या पुलाच्या बांधकामासाठी निधी मंजूर होऊनही प्रत्यक्षात काम सुरू न झाल्याने प्रशासनाची गंभीर बेपरवाई पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या पुलाच्या दोन्ही बाजू पूर्णपणे खुल्या असून, तात्पुरत्या स्वरूपात बॅरिकेट लावण्यासही प्रशासनाने नकार दिला आहे म्हणून या परिस्थिती विरोधात संताप्त अक्षय भुसारे या युकाने आज पुलाखाली सासलेल्या घाण दुर्गंधीयुक्त पाण्यात उतरून अनोखे व तीव्र आंदोलन सुरू केले आहे