चिखली: भोरसी येथे सासरच्यांकडून विवाहितेचा छळ; हुंड्यासाठी सात लाखांची मागणी, पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
भोरसी येथील एका २१ वर्षीय विवाहितेस सासरच्यांकडून हुंड्याच्या कारणावरून मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रुबीना परवीन शेख सादिक (वय २१, रा. भोरसा भोरसी, ह. मू. मोहदरी, ता. चिखली) हिने १६ ऑक्टोबर रोजी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.