रामटेक: आगामी निवडणुका संदर्भात दीप हॉटेल रामटेक येथे राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक संपन्न
Ramtek, Nagpur | Oct 19, 2025 आगामी स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संदर्भात तसेच पक्ष संघटना वाढविणे व मजबूत करण्याच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक रविवार दिनांक 19 ऑक्टोबरला दुपारी तीन वाजता पासून ते सायंकाळी पाच वाजता पर्यंत दीप हॉटेल रामटेकच्या सभागृहात संपन्न झाली. याप्रसंगी नागपूर जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे यांनी बैठकीची अध्यक्षता केली. यावेळी पार्टीचे पदाधिकारी अतिथी म्हणून उपस्थित होते.