सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश भूषण गवई यांचा आरक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा संविधानिक किंवा फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा नसून तो मनुवादी किंवा हिंदुत्ववादी विचारधारेच्या प्रभावाखालचा आहे असं दिसतं. त्याचं कारण असं आहे की संविधानामध्ये आरक्षणाचं तत्व समाविष्ट करताना संविधानकर्त्यांनी हे प्रतिनिधित्वाचं तत्व म्हणून समाविष्ट केलेलं आहे.