मुर्तीजापूर: देवरन रस्त्यावर कत्तलीसाठी नेणाऱ्या २ गोवांशांना शहर पोलिसांनी दिले जीवनदान,शहर पोलीस स्टेशनला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात हेड पोलीस कॉन्स्टेबल सुरेश पांडे,सचिन दांदळे,पोलीस कॉन्स्टेबल सचिन दुबे,गजानन खेडकर,कृष्णा येरमुले शुक्रवार २६ सप्टेंबर रोजी रात्री अकराच्या दरम्यान शहरात गस्त देत असताना बातमी दाराकडून माहिती मिळाली की आरोपी मुशीर अहमद जमीर अहमद हा दोन गोवांश अंदाजे किंमत ४० देवरन रस्त्याने पठाणपुरा येथे त्याच्या पायाला व गळ्याला आखूड दोरीने बांधून लाकडी काठीने त्यांना यातना देत नेत आहे अशी माहितीवरुन आरोपीला शहर पोलिसांनी रंगेहाथ पकडले.