जालना: जालना तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाकडून इच्छुकांचे अर्ज भरण्यास सुरुवात
Jalna, Jalna | Nov 1, 2025 जालना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीपे आजपासून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून जालना तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या वतीनेही तालुकाध्यक्ष कृष्ण पडूळ यांच्या नेतृत्वात उमेदवारांचे अर्ज भरणे सुरु झाले आहे. शनिवार दि. 1 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात अर्ज भरायला सुरुवात केलीय. शिवाय जे इच्छूक असतील त्यांनी अर्ज भरावेत असे आवाहन करण्यात आले.